मार्केटयाड पोलीस तपास पथकाकडून आरोपीस अटक
पुणे (सतीश जाधव )
मार्केटयार्ड पोलीस ठाणे कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रकाश देवराम परिहार ऊर्फ पक्या, वय २५ वर्षे, रा. गल्ली नं. ०१, राम मंदीराजवळ, लोहीया नगर, पुणे याने आंबेडकरनगर परीसरात एका इसमास सुरी दाखवुन मोबाईल व रोख रक्कम चोरी केली असुन मार्केटयार्ड पोलीस स्टेशन गु.र.नं. ३४/२०२४ भा.द.वि.कलम ३९४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्याबाबत सविस्तर माहिती अशी की, मार्केटयार्ड पोलिस ठाणे च्या हद्दीत. वरिष्ठांच्या आदेशाने
मार्केटयार्ड पोलीस ठाणेचे कार्यक्षेत्रातील शिवजयंती निम्मीत्त मिरवणुक असल्याने रेकॉर्डवरील आरोपी, पाहिजे आरोपी, चेक करणेकामी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे दिमतीत तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक कांबळे , पोहवा ३४५३ थोरात, पोनाइक ७५५४ जाधव, पोअं ८२३५ गायकवाड, पोअं २३९२ यादव, १०४६४ झायटे यांचेसह रात्री 8 वाजता खाजगी वाहनाने मार्केटयार्ड पो.स्टे. व्या हदीत रवाना झालो. आम्ही आपापले वाहनाने मार्केटयार्ड मधून रिक्षा स्टॅन्ड येथे पेट्रोलींग करीत असताना पोअंमलदार ८२३५ गायकवाड यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, प्रकाश देवराम परिहार ऊर्फ पक्या, हा शारदा गजानन मंदिरा शेजारील पान टपरी शेजारी उभा असल्याची बातमी मिळाली असता सदरची बातमी ही आम्हास सांगितली असता आम्ही सदरची बातमी ही वरिष्ट पोलीस निरीक्षक मार्केटयार्ड पो.स्टे. पुणे यांना कळविली असता, त्यांनी सदर बातमीची खात्री करुन कारवाई करणे बाबत तोंडी आदेश दिल्याने आम्ही शारदा गजानन मंदिरा शेजारी आड बाजुस उभे राहुन पाहणी केली असता, बातमी प्रमाणे प्रकाश देवराम परिहार ऊर्फ पक्या हा पान टपरी समोर उभा असल्याचे दिसल्याने आम्ही त्याचे दिशेने जात असताना त्याची आमचे नजरानजर झाली असता. तो आम्हास पाहून पळून जात असताना त्यास आम्ही थोड्याच अंतरावर पकडले त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याचे नाव प्रकाश देवराम परिहार ऊर्फ पक्या, वय २५ वर्षे, रा. गल्ली नं. ०१, राम मंदीराजवळ, लोहीया नगर, पुने असे सांगितले असुन त्याचे कडे दाखल गुन्हयाबाबत तपास करता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यास दाखल गुन्हयात 9.45 वा. खालील कारणास्वत अटक करण्यात आली आहे. दाखल गुन्हयातील आरोपीची पोलीस कस्टडी घेवुन त्यास अधिक विश्वासात घेता आरोपी प्रकाश देवराम परिहार ऊर्फ पक्या, याने ८५,००० किमती चा 6 मोबाईल, १०,००० कि, ०१ अॅक्टीव्हा मोपेड व १०० रु कि चा सुरा असा एकुण ९५,१०० रुपये किं चा माल पंचासमक्ष जप्त करण्यात आलेला आहे. सदर अॅक्टीव्हा मोपेड गाडी क्र. एमएच १२ जे.एच ५८९७ बाबत मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथील गुन्हयाचा अभिलेख तपासला असता वरील वर्णनाचे अॅक्टीव्हा चोरी बाबत मार्केटयार्ड पो.स्टे. गु.र.नं. २६७/२०२३ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असुन दोन गुन्हे उघड करण्यात आले आहे.
सदरची कारवाई अमितेष कुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर, प्रवीण पवार . सह पोलीस आयुक्त, मनोज पाटील अप्पर पोलीस आयुक्त, आर राजा पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ पुणे गणेश इंगळे .सहा पोलीस आयुक्त वानवडी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांचे आदेशाने तपास पथकाचे सपोनि नंदन कांबळे, सोबत पोहवा ३४५३ थोरात, पोना १५५४ जाधव, पोअं ८२३५ गायकवाड, पोअं २३९२ यादव, पोअं १०४६४ झायटे यांनी केली आहे.