दिनांक १३ रोजी दुपारी १२.३० ते ३.०० वा चे सुमारास रजनीगंधा हौसिंग सोसायटी वाल्हेकरवाडी चिंचवड येथे अज्ञात चोरटयाने घराच्या मागच्या दरवाजातून प्रवेश करुन १२५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने चोरल्याची फिर्याद चिंचवड पोलीस स्टेशनला दाखल झाली.
गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांनी अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेसह लागलीच घटनास्थळी जावुन सदर चोरीचे गुन्हयाचा समांतर तपास सुरु केला. घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता घराचा मागील दरवाजा, लोखंडी कपाट यांची कोणत्याही प्रकारची तोडफोड झाली नसल्याचे व दरवाजाची आतील कड़ी बाहेरुन हात घालुन उघडणे शक्य नसल्याचे प्रथमदर्शनी दिसुन आले. सदरची चोरी घरातीलच कोणीतरी इसमाने केल्याचा संशय बळावला. घरातील सद्दस्यांकडे सखोल विचारपुस करुन माहीती घेतली असता फिर्यादी या मेडीकलचे दुकान चालवित असुन त्यांचे पती नोकरीसाठी दिवसा बाहेर असतात. फिर्यादी यांचा सख्खा भाऊ श्रीकांत दशरत पांगरे हा गेले चार महीन्यापासुन त्यांचेकडे राहणेस आला असुन झोपटो कंपनीत डिल्हीवरी बॉय म्हणुन काम करतो. पोलीस उप निरीक्षक गणेश माने, पोलीस हवालदार जयवंत राऊत, देवा राऊत यांनी श्रीकांत पांगरे याचेबाबत गोपनिय बातमीदाराकरवी माहीती घेतली असता श्रीकांत पांगरे हा मुळचा कुंभेजळगाव ता. गेवराई जि. बीड येथील रहीवाशी असुन त्याला जुगार खेळण्याचा नाद आहे. त्याने गावाकडील ५ एकर शेत जमीन विकुन जुगारात हारल्याची माहीती मिळालेने श्रीकांत याचेबावत संशय बळावला. श्रीकांत याच्या हालचालीवर लक्ष ठेवून तपास करीत असतांना तो त्याचे मुळगावी पळून जाण्याच्या तयारीत असल्याची बातमी पोलीस हवालदार जयवंत राऊत व देवा राऊत यांना मिळालेने वाल्हेकरवाडी चिंचवड येथे सापळा लावुन आरोपी श्रीकांत दशरत पांगरे वय २९ वर्षे धंदा झेपटो कंपनीत डिल्हीव्हरी बॉय रा. मुळ कुंभेजळगाव ता. गेवराई जि. बिड सध्या रा. रजनीगंधा हौसिंग सोसाटी वाल्हेकरवाडी चिंचवड यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याचेकडे सखोल विचारपुस केली तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागल्याने त्यास विश्वासात घेवून माहीती घेतली असता जुगारात हारलेली रक्कम ऑनलाईन जुगार खेळून लोकांची उधारी-उसनवारी देणेसाठी बहीणीचे घरामध्ये चोरी केली. घराचा मागील दरवाजा कोणाच्या लक्षात येणार नाही अशाप्रकारे मुदाम उघडा ठेवून घरी कोणी नसतांना कपाटातील १२५ ग्रॅम वजनाचे दागीने चोरुन त्याचेवर कोणाचे संशय येवू नये म्हणुन स्वतः बहीणी सोबत पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेल्याचे सांगितले. अत्यंत कसोटीने व कौशल्याने तपास करुन श्रीकांत दशरत पांगरे वय २९ वर्षे धंदा झेपटो कंपनीत डिल्हीव्हरी बॉय रा. मुळ कुंभेजळगाव ता. गेवराई जि. बिड सध्या रा. रजनीगंधा हौसिंग सोसाटी वाल्हेकरवाडी चिंचवड यास शिताफीने ताब्यात घेवून १,३७,५०० रुपये किंमतीचे १२५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने हस्तगत करुन चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त गुन्हे संदिप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उप निरीक्षक गणेश माने, सपोफी प्रमोद वेताळ, पोलीस हवालदार जयवंत राऊत, देवा राऊत, आतिष कुडके यांनी केली आहे.