मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता प्रसाद ओक कायचम त्याच्या अभिनयामुळे ओळखला जातो. ‘धुरळा’, ‘हिरकणी’, ‘ये रे ये रे पैसा २’, ‘फर्जंद’ अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये झळकलेला प्रसाद सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या रिअॅलिटी शोमध्ये झळकत आहे. विशेष म्हणजे या शोच्या निमित्ताने त्याचं एक कित्येक वर्षांपासूनचं अपूर्ण स्वप्न पूर्ण झालं आहे. त्यामुळेच त्याने सोशल मीडयावर एक पोस्ट करत त्याच्या एका खास माणसाचे आभार मानले आहेत.
अलिकडेच ‘हास्यजत्रे’च्या टीमने ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय शोच्या मंचावर हजेरी लावली. यावेळी हास्यजत्रेच्या टीमला अभिनेता अमिताभ बच्चन
यांना भेटण्याची संधी मिळाली. प्रसादचं कित्येक वर्षांपासून बिग बींना भेटण्याचं स्वप्न होतं. अखेर त्याचं हे स्वप्न पूर्ण झालं. मात्र, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याचा जवळचा मित्र अमित फाळकेने मदत केल्यामुळे प्रसादने त्याचे आभार मानले आहेत.